Breaking News
Loading...

Breaking News

6/recent/ticker-posts

दिलीप शिरढोणे यांचे योगदान महत्वाचे -विद्याधर कांबळे.

 


दिलीप शिरढोणे यांचे योगदान महत्वाचे -विद्याधर कांबळे.

दत्तवाड:प्रतिनिधी : शिक्षण,समाज व प्रसारमाध्यमातील क्षेत्रात कार्यरत असतानाच गरजू व वंचित घटकातील लोकांसाठीचे दिलीप शिरढोणे सरांचे योगदान महत्वाचे असल्याचे प्रतिपादन शिरोळ तालुका वंचित बहुजन आघाडीचे तालुका उपाध्यक्ष विद्याधर कांबळे यांनी केले. ते कन्या विद्या मंदिर हेरवाड ता. शिरोळ येथे दिलीप शिरढोणे यांची बदली झालेने सदिच्छा देताना बोलत होते.

      या प्रसंगी उपस्थित शिरोळ तालुका वंचित बहुजन आघाडीचे तालुका सचिव रवी कांबळे म्हणाले की दिलीप शिरढोणे सरांचा सर्वांना सहकार्य करण्याचा गुण आदर्शवत असा आहे.

               याप्रसंगी सामाजिक कार्यकर्ते भरत धोंड,विजय कांबळे,मुख्याध्यापक सुभाष तराळ,बाबालाल बाणदार,गुंडा परीट,ज्योती परीट,प्रेरणा मोरे यांच्यासह विद्यार्थिनी उपस्थित होत्या.