नागपूर कोळी जमातीच्या भव्य मोर्चास हुपरीकर जाणार.
नागपूर कोळी जमातीच्या भव्य मोर्चास हुपरीकर जाणार.
दत्तवाड:प्रतिनिधी : आदिवासी कोळी महादेव,डोंगर कोळी,कोळी मल्हार, टोकरे कोळी, कोळी ढोर यांच्यावरील खरे -खोटे भेदभाव करुन करीत असलेल्या दुजाभावाला वाचा फोडण्यासाठी दिनांक १० डिसेंबर २०२५ रोजी निघणाऱ्या नागपूर हिवाळी अधिवेशनावरील विराट मोर्चात हुपरी शहरातील जमात बांधव मोठया संख्येने सहभागी होण्याचा निर्धार आयोजित सभेत करण्यात आला.
विराट मोर्चाचे प्रमुख आयोजक दत्ताभाऊ सुरवसे यांनी उपस्थित जमात बांधवांना मार्गदर्शन करुन सातत्याने सुरु असलेल्या अन्यायाविरुध्द आवाज उठविण्यासाठी १० डिसेंबरच्या हिवाळी अधिवेशनावरील विराट मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन केले.
जिल्हा संघटनेचे सचिव रमेश शंकर कोळी यांनी जमात बांधवांना मार्गदर्शन केले.
याप्रसंगी जवाहर साखर कारखान्याचे संचालक सूरज बेडगे, श्रीकांत ऐनापूरे,दिलीप गुंडा कोळी, संजय कोळी,बबलू कोळी यांचेसह कोळी जमात बांधव बहुसंख्येने उपस्थित होते.
