Breaking News
Loading...

Breaking News

6/recent/ticker-posts

जयसिंगपूर शहराचा सर्वांगीण विकास राजर्षी शाहू विकास आघाडीच करणार : सावकार मादनाईक

 


जयसिंगपूर शहराचा सर्वांगीण विकास राजर्षी शाहू विकास आघाडीच करणार : सावकार मादनाईक

जयसिंगपूर :( मिलिंद देशपांडे)

विरोधकांनी कितीही बिन बुडाचे आरोप केले तरीही यावर एकच उत्तर आहे ते म्हणजे शहराचा विकास. माझ्या राजकीय कारकीर्दीत पहिल्यांदाच शिरोळ तालुक्यात एवढ्या मोठ्या प्रमाणात फंड आणणारे आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर हे एकमेव नेते आहेत. त्यामुळे यापुढेही जयसिंगपूर शहरासह शिरोळ तालुक्याच्या विकासासाठी राजर्षी शाहू विकास आघाडीच्या उमेदवारांना नगरपालिकेत पाठवणे गरजेचे आहे असे मत शेतकरी नेते भाजपाचे पदाधिकारी सावकर मादनाईक यांनी मांडले. आहे. २०० हून अधिक झोपडपट्टी धारकांना प्रॉपर्टी कार्ड दिले आहे या पुढील काळात उर्वरित झोपडपट्टी धारकांचा प्रश्न मार्गी लावणार आहे, हा जिव्हाळ्याचा प्रश्न आम्ही सोडवला आहे, त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना त्यांच्या हक्काची आणि स्वप्नातील घरे मिळवून आम्ही दिली आहेत. यापुढेही शहरातील सर्वच प्रश्नांसाठी राजर्षी शाहू विकास आघाडी काम करेल, असा दावा त्यांनी यावेळी व्यक्त केला. 

या प्रचार फेरीत अनिल बागणे, मिलिंद भिडे, रमेश यळकुडकर, शिवाजी कुंभार, प्रवीण इंगळे, अमर खाडे, तेजस कुऱ्हाडे, गणेश तावडे, सुजित दानोळी, शीतल पाटील यांच्यासह  पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.