Breaking News
Loading...

Breaking News

6/recent/ticker-posts

*विचारांची दीपशिखा : हेरवाडचे आदर्श शिक्षक व अभ्यासू पत्रकार दिलीप शिरढोणे*

 



*विचारांची दीपशिखा : हेरवाडचे आदर्श शिक्षक व अभ्यासू पत्रकार दिलीप शिरढोणे*


मा दिलीप शिरढोणे सर (हेरवाड ) यांच्या वाढदिवसानिमित्त दोन शब्द.
      हेरवाडचे आदर्श शिक्षक आणि अभ्यासू पत्रकार
मा. दिलीप शिरढोणे सर म्हणजे विचारांची दीपशिखा आहेत. विद्यार्थ्यांच्या आयुष्याला दिशा देणारा शिक्षक
आणि समाजाच्या प्रश्नांना वाचा फोडणारा निर्भीड पत्रकार म्हणून त्यांची सर्वांना ओळख आहे. वाणी आणि शब्दांमध्ये सत्य आणि लेखणीत प्रामाणिकपणा
हेच त्यांचे आयुष्याचे खरे शस्त्र आहे. न्यायाची चाड व अन्यायाची चीड घेवून समाजाप्रति काम करणारे हे व्यक्तिमत्व समाजप्रिय आहे. सत्तेपुढे न झुकणारी लेखणी, अन्याया विरोधात उभी राहणारी भूमिका
यामुळे ते समाजाचे खरे प्रहरी आहेत. शिक्षणातून माणूस घडवताना समाजमन घडवण्याचे कार्य त्यांनी अखंड केले असून गोरगरिबांचा आवाज बनून दुर्लक्षित प्रश्न प्रकाशात आणले आहेत. काम कमी आणि चर्चा डोंगराएवढी असे कधीच त्यांना जमले नाही. खरेपणा जिवंत राहिला पाहिजे. सामान्य माणसाला बळ मिळाले पाहिजे. शाळाबाह्य मुलं शिक्षणाच्या प्रवाहात आली पाहिजेत. दुर्लक्षित, उपेक्षित घटकाला आधार देणारी चळवळ उभारली पाहिजे यासाठीच त्यांचा लेखन प्रपंच असतो.
      सामाजिक शैक्षणिक व पत्रकारिता या क्षेत्रात काम करणारे दिलीप शिरढोणे सर यांना विविध सेवाभावी संस्था व्यक्तींच्या वतीने जिल्हा व राज्यपातळीवर गौरव झाला आहे. पण कार्यातून मिळालेले पद हे मिरवण्याचे नाही तर समाजाच्या कल्याणासाठी पुन्हा -पुन्हा गिरवण्यासाठी आहे अशी विचारधारा समाजात रुजविण्याचा प्रयत्न केला आहे. कोणताही गाजावाजा न करता समाजासाठी तळमळीने झटणारा हाडाचा पत्रकार आणि संस्कारांची शिदोरी देणारा शिक्षक म्हणजेच मा. दिलीप शिरढोणे सर यांच्या वाढदिनी ते करीत असलेल्या कर्तृत्वाला सॅल्यूट !. 
       " हिरवागार परिसर म्हणजे जीवन नवे,
          प्रत्येकाने एक झाड लावायला हवे
          कुणी करा, राजकारण.....
          कुणी करा समाजकारण....
          पण ,नका हो विसरू वनीकरण.... "!
  असा पर्यावरण वाचवण्याचा संदेश, माणूसपण जपण्याचे संस्कार आणि लेखणी, ज्ञान मंदिरातून सामाजिक एकता जपण्याचे विचार रुजवणाऱ्या शिक्षक व पत्रकार मित्राला मनापासून वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ! त्यांना व त्यांच्या कुटुंबीयांना दीर्घायुष्य व आरोग्यदायी शुभेच्छा !
--- *डॉ दगडू माने (पत्रकार* )
& महाराष्ट्र शासन समाजभूषण / दलितमित्र
& सामाजिक कार्यकर्ता व अभिनेता शिरोळ