घराघरात महाविकास आघाडीच्या उमेदवाराचे चिन्ह पोचवा. यासाठी सर्व कार्यकर्त्यांनी नियोजन करावे. -- नितीन बागे
घराघरात महाविकास आघाडीच्या उमेदवाराचे चिन्ह पोचवा. यासाठी सर्व कार्यकर्त्यांनी नियोजन करावे.
-- नितीन बागे
दत्तवाड. घराघरात महाविकास आघाडीच्या उमेदवारांचे चिन्ह व विचार पोचवून दत्तवाड जिल्हा परिषद मतदार संघात पुन्हा महाविकास आघाडीच्या झेंडा फडकवण्याचे काम कार्यकर्त्यांनी करावे. सर्वसामान्यांना न्याय देण्यासाठी महाविकास आघाडी सर्व प्रयत्न करेल दत्तवाड जिल्हा परिषद मतदार संघात काँग्रेसचा झेंडा फडकत ठेवावा याबरोबरच दत्तवाड पंचायत समिती व सैनिक टाकळी पंचायत समिती येथे असणाऱ्या स्वाभिमानी व शिवसेना उबाटा गटाच्या उमेदवारांना विजयी करावे अशी आव्हान नितीन बागे यांनी केले ते दत्तवाड येथे झालेल्या कार्यकर्ता संवाद मेळाव्यात बोलत होते मेळाव्याच्या अध्यक्षांनी स्वाभिमानीचे प्रकाश सिद्नाळे होते.
महाविकास आघाडी मार्फत दतवाड जिल्हा परिषदेचे उमेदवार राधा उर्फ दिपाली उदय पाटील, दतवाड पंचायत समितीचे उमेदवार स्वाभिमानीचे विवेक चौगुले टाकळी पंचायत समितीचे उमेदवार शिवसेना उबाटा गटाचे रणजीत पाटील यांच्या कार्यकर्त्यांचा संवाद मेळावा दत्तवाड येथे पार पडला.
यावेळी नितीन बागे यांनी घराघरात पक्षाचे चिन्ह पोचवण्यासाठी सूक्ष्म नियोजन करावे आपली ध्येय धोरणे प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचवण्यासाठी कार्यकर्त्यांनी झटावे असे सांगितले
सुरेश पाटील यांनी आपण केलेले कार्य जनतेला सांगावे कोणावरही टीका करणे. असे सांगून कार्यकर्त्यांनी काँग्रेस स्वाभिमानी शिवसेना उबाटा आघाडी नैसर्गिक आघाडी असून दतवड मतदारसंघात सर्वांनी एक दिलाने काम करून विजयी करावे असे आव्हान केले.
तर सुरज शिंगे यांनी काँग्रेस पक्षाने सर्वसामान्यांना राबवलेल्या योजना मतदारांना सांगाव्यात . असे सांगितले.
यावेळी देवराज पाटील, बसगोडा पाटील, स्वप्निल पाटील टाकळी, एन एस पाटील, प्रकाश रांगोळे, उदय पाटील, उमेदवार राधा उर्फ दिपाली पाटील, विवेक चौगुले, उदय पाटील बाळासाहेब कोकणे यांनी मनोगत व्यक्त केली.
.jpg)

