Breaking News
Loading...

Breaking News

6/recent/ticker-posts

*विकासासाठी कमळ चिन्हावरच बटन दाबा* सुशांत पाटील



 *विकासासाठी कमळ चिन्हावरच बटन दाबा* सुशांत पाटील

दत्तवाड  जे देशात राज्यात योजना आहेत त्या योजना गावागावात पोहोचवण्यासाठीच भाजपला मतदान करा. कारण देशात राज्यात जिल्ह्यात तालुक्यात व गावात एक पक्ष असेल तर विकासाच्या योजना तळागाळापर्यंत पोहोचवण्यास मदत होते त्यामुळे गावागावात कमळ फुलले पाहिजे यासाठीच दत्तवाड जिल्हा परिषद मतदार संघातील सर्व नागरिकांनी भारतीय जनता पार्टीला मतदान करावे असे आवाहन सुशांत पाटील यांनी केले .

ते दतवाड येथे जिल्हा परिषद पंचायत समिती भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांच्या प्रचार कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते. 

 यावेळी किसान मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष राजगौडा पाटील यांनी गावागावात पोहोचलेल्या योजना त्या योजनेतून दतवाड मध्ये झालेला विकास व होऊ घातलेल्या निवडणुकीनंतर सर्वसामान्यांना होणारा फायदा विशद करून भारतीय जनता पार्टीलाच विजयी करावे असे सांगितले. 

यावेळी संजय पाटील, जिल्हा परिषद उमेदवार मृणालीराजे पाटील, पंचायत समिती उमेदवार बाबुराव पवार, बबन मोटे, मयूर खोत यांनी मनोगते व्यक्त केली. 

कार्यक्रमास दत्तवाड सह परिसरातील भाजप कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.