दत्तवाड जिल्हा परिषद मतदार संघात कमळ फुलणार जनतेचा विश्वास
दत्तवाड
दत्तवाड जिल्हा परिषद मतदार संघात कमळ फुलणार जनतेचा विश्वास
5 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी दत्तवाड जिल्हा परिषद मतदार संघातून भारतीय जनता पार्टीच्या मृणालिनी राजे पाटील दत्तवाड पंचायत समिती मतदारसंघातून बाबुराव पोवार हे उमेदवार असून जनतेने या दोघांनाही भरपूर मतांनी निवडून देण्याचा निर्धार केला आहे.
जे दिल्लीत जे राज्यात तेच गावागावात या निर्धाराने भारतीय जनता पार्टीने दिलेल्या अनेक योजना सर्वसामान्य मान्य झाल्या असून त्याचा फायदा दिसत आहे त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत कमळ चिन्हावरील बटन दाबून पुन्हा पंचायत समिती जिल्हा परिषद निवडणुकी त भाजपाला निवडून देण्याचा निर्धार जनतेने केला आहे.
दतवाड पाठोपाठच टाकळीवाडी येथे निवडणूक कार्यालयाच्या उद्घाटन मोठ्या उत्साहात झाले यावेळी उमेदवार मृणाली राजे पाटील बाबुराव पोवार, संजय पाटील, सुशांत पाटील यांच्यासह टाकळीवाडी घोसरवाड दत्तवाड या गावातील सर्व कार्यकर्ते मोठ्या उत्साहाने उपस्थित होते.
