Breaking News
Loading...

Breaking News

6/recent/ticker-posts

दत्तवाड जिल्हा परिषद मतदार संघात काँग्रेस पक्षालाच मतदान जनतेचा निर्धार

 



दत्तवाड 

दत्तवाड जिल्हा परिषद मतदार संघात काँग्रेस पक्षालाच मतदान करण्याचा जनतेचा निर्धार राजापूर, दानवाड खिद्रापूर येथील प्रचार फेरीत नागरिकांनी दिला उत्स्फूर्त प्रतिसाद. 

 शनिवार दिनांक  ७ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकीत दत्तवाड मतदार संघासाठी काँग्रेस पक्षाच्या अधिकृत उमेदवार राधा उर्फ दिपाली पाटील यांच्या हात या चिन्हा समोरील बटन दाबून त्यांना निवडून देण्याचा निर्धार जनतेने केला आहे.


राजापूर खिद्रापूर दानवाड येथे नुकतीच प्रचार फेरी पार पडली यादरम्यान गावातील नागरिकांनी उस्फुर्त प्रतिसाद दिला. हा काँग्रेसचा बालेकिल्ला असून काँग्रेस सर्व सामान्य जनतेसाठी काम करते त्यामुळे आम्ही तुमच्या पाठीशी आहोत असे त्यांनी आवर्जून सांगितले. 

प्रचार फेरीत वृद्ध ,महिला, युवक यांनी उमेदवारांची भेट घेऊन आम्ही तुमच्या पाठीशी आहोत असे सांगितले. 

काँग्रेसचा बालेकिल्ला पुन्हा टिकवण्यासाठी हात चिन्हा समोरील बटन दाबण्याचा निर्धार नागरिकांनी केला आहे.