Breaking News
Loading...

Breaking News

6/recent/ticker-posts

पूर्व प्राथमिक प्राथमिक शाळेत आनंदी बाल बाजार, हळदी कुंकू कार्यक्रम संपन्न

 


पूर्व प्राथमिक प्राथमिक शाळेत आनंदी बाल बाजार, हळदी कुंकू कार्यक्रम संपन्न

दत्तवाड 

भाजीपाला, खाऊ इतर वस्तू यांच्या खरेदी-विक्रीचा अनुभव विद्यार्थ्यांना व्हावा या उद्देशाने येथील पूर्व प्राथमिक व प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांसाठी बाल बाजाराचे आयोजन करण्यात आले होते.

यात मोठा गट ते चौथीपर्यंत विद्यार्थ्यांनी विविध वस्तूंची विक्री केली वस्तू खरेदी करण्यासाठी पालकांसह नागरिकांनी गर्दी केली होती. यातून या बाल विद्यार्थ्यांना व्यवहार ज्ञानाबरोबर विक्री कौशल्याचे ज्ञान मिळाले.



बाल बाजाराचे उद्घाटन रायकर ज्वेलर्सचे मालक अरुण रायकर, संजय मलिकवाडे यांनी केले . माता पालकांच्या हळदीकुंकू कार्यक्रमासाठी ग्रामपंचायत सदस्या  मनीषा चौगुले, वैशाली चौगुले उपस्थित होत्या 

 यावेळी शाळा समिती अध्यक्ष अजित चौगुले मुख्याध्यापक एम आर पाटील, शाळा व्यवस्थापन चे कपिल मलिकवाडे  प्रमुख उपस्थितीत होते.

यावेळी सुरेश चव्हाण यांच्यासह सहाय्यक शिक्षिका सारिका शिंदे , पल्लवी गळगे, रेशमा  सुतार , संजीवनी हेरवाडे , यांचा सह पालक माता पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते .कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मंदा देशपांडे  यांनी केले