Breaking News
Loading...

Breaking News

6/recent/ticker-posts

अजातशत्रू बाबुराव पोवार यांचा विजय निश्चित




 दत्तवाड- प्रतिनिधी

     भारतीय जनता पार्टीचे दत्तवाड पंचायत समिती मतदार संघाचे अधिकृत उमेदवार बाबुराव दत्तात्रय पोवार यांना दत्तवाड येथील जनतेचा वाढता पाठिंबा असल्याचे दिसून येत आहे. बाबुराव पोवार हे भारतीय जनता पार्टी कडून दत्तवाड पंचायत समिती मतदार संघामध्ये निवडणूक लढवत असून त्यांच्या 'कमळ' या चिन्हाला जनतेतून पसंती मिळत असल्याने दत्तवाड पंचायत समिती मतदार संघात बाबुराव पोवार यांचे 'कमळ' फुलणार हे मात्र निश्चित झाले असल्याचे बोलले जात आहे. 

    बाबुराव पोवार यांचा दत्तवाड पंचायत समिती मतदार संघात जनसंपर्क मोठा असल्यामुळे दत्तवाड, टाकळीवाडी, घोसरवाड येथील जनता बाबुराव पोवार यांच्या पाठीशी असल्याचे चित्र  दिसत आहे. त्यामुळे बाबुराव पोवार यांना दत्तवाड पंचायत समिती मतदार संघातील जनता निवडून आणणार असा विश्वास काही जाणकार मतदाराकडून बोलले जात आहे.