Breaking News
Loading...

Breaking News

6/recent/ticker-posts

हेरवाडमधील गरीब कुटुंबातील विद्यार्थिनीच्या उच्च शिक्षणाचे स्वप्न साकार; स्नेहा देसाई यांच्या तत्परतेमुळे पुण्यात मिळाले शैक्षणिक बळ*



 *हेरवाडमधील गरीब कुटुंबातील विद्यार्थिनीच्या उच्च शिक्षणाचे स्वप्न साकार; स्नेहा देसाई यांच्या तत्परतेमुळे पुण्यात मिळाले शैक्षणिक बळ*

​हेरवाड : प्रतिनिधी:ग्रामीण भागातील होतकरू आणि हुशार विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी पुणे-मुंबईसारख्या मोठ्या शहरांमध्ये जावे लागते. मात्र, तेथील राहण्याचा आणि खाण्याचा वर्षभराचा खर्च लाखो रुपयांच्या घरात जातो. सर्वसामान्य व गोरगरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांना हा अवाढव्य खर्च परवडणारा नसतो. अशा वेळी सेवाभावी वृत्तीने चालवल्या जाणाऱ्या वसतिगृहांचा (Hostels) मोठा आधार मिळतो. परंतु, या ठिकाणी प्रवेश मिळवण्यासाठी योग्य शिफारस आणि सातत्यपूर्ण पाठपुरावा असणे आवश्यक असते. नेमकी हीच गरज ओळखून हेरवाड येथील एका गरीब विद्यार्थिनीला शैक्षणिक बळ देण्याचे मोलाचे काम राष्ट्रवादी महिला कॉंग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पार्टीच्या तालुकाध्यक्षा व सामाजिक कार्यकर्त्या सौ.स्नेहा वसंतराव देसाई यांनी केले आहे.


*​सी.ए. बनण्याचे स्वप्न होणार पूर्ण!*

​हेरवाड (ता. शिरोळ) येथील एका सर्वसामान्य कुटुंबातील अत्यंत हुशार विद्यार्थिनी कु.स्वाती सुरेश चव्हाण ही पुण्याच्या नामांकित बृहन्महाराष्ट्र कॉलेज ऑफ कॉमर्स (BMCC) या संस्थेत वाणिज्य शाखेत एस.वाय.बी.कॉम मध्ये शिकत आहे. तिला 'सी.ए.' (Chartered Accountant) चे उच्च शिक्षण घ्यायचे होते. ४ते ५ वर्षे पुण्यात राहावे लागणार होते. यापूवीच्या होस्टेलचा खर्च खूप मोठा होता.मात्र,पुण्यातील राहण्याच्या आणि खाण्याच्या वाढत्या खर्चामुळे तिच्या पालकांसमोर मोठी अडचण निर्माण झाली होती.


*​अशी मिळाली मदत...*

*अडचणीची जाण:* पालकांनी आपल्या मुलीच्या पुण्यातील राहण्याची ही अडचण सामाजिक कार्यात नेहमी अग्रेसर असणारे दिलीप शिरढोणे सर यांच्या कानावर घातली.


*​ तात्काळ हालचाली:* शिरढोणे सरांनी क्षणाचाही विलंब न लावता बहुजन समाजाचे नेते व हेरवाडचे माजी सरपंच वसंतराव देसाई आणि राष्ट्रवादी महिला काँग्रेस (शरदचंद्र पवार पक्ष) शिरोळ तालुका अध्यक्षा सौ.स्नेहा वसंतराव देसाई यांच्याशी संपर्क साधून परिस्थितीची कल्पना दिली.


*​ पुण्यात मिळाला होस्टेल प्रवेश:* सौ. स्नेहा देसाई यांनी या प्रकरणात वैयक्तिक लक्ष घालून तातडीने पुढील सूत्रे हलवली. त्यांच्या विशेष प्रयत्नांमुळे आणि योग्य पाठपुराव्यामुळे त्या विद्यार्थिनीला पुण्याच्या शिवाजीनगर भागातील नामांकित 'लाला लजपतराय हाउसिंग सोसायटी'च्या गर्ल्स हॉस्टेलमध्ये माफक दरात प्रवेश मिळाला.


*​परिसरातून कौतुकाचा वर्षाव*

​सौ.स्नेहा देसाई यांच्या या तत्परतेमुळे एका गरीब पण अत्यंत होतकरू विद्यार्थिनीच्या उच्च शिक्षणाचा मार्ग सुकर झाला आहे. वेळेत मिळालेल्या या मदतीबद्दल विद्यार्थिनीच्या पालकांनी अत्यंत भावूक होत कृतज्ञता व्यक्त केली आहे.

         ​गरीब आणि गरजू विद्यार्थ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिल्याबद्दल सौ. स्नेहा वसंतराव देसाई, वसंतराव देसाई आणि दिलीप शिरढोणे सर यांच्या सेवाभावी वृत्तीचे व शैक्षणिक कार्याचे हेरवाड आणि संपूर्ण शिरोळ तालुक्यातून भरभरून कौतुक होत आहे.